Posts

Showing posts from July, 2019

आम्ही जिंकतोय की हरतोय?

 पुष्कराज चव्हाण  मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकांची रणधुमाळी नुकतीच पार पडली. निवडणुकीचा निकाल २३ फेब्रुवारी २०१७ रोजी जाहीर झाला आणि त्यादरम्यान उडालेला धुरळा आताशी कुठे निवतोय. आता सत्ता समीकरणं जुळवण्यात सर्वपक्षीय मंडळी गुंतलेली असताना समाज माध्यमांवर आजही मार्मिक किस्से, चुटकुले आणि कोपरखळ्यांच्या संदेशांची देवाण घेवाण चालूच आहे. यातच एक संदेश विचारांना चालना देऊन गेला. यात मुंबई महानगर पालिकेत निवडून आलेल्या ५५ ते ६० परप्रांतीय उमेदवारांच्या नावांची यादी होती. आणि ती यादी वाचल्यावर भविष्यात उभ्या ठाकलेल्या धोक्याची जाणीव झाली. एकूण २२७ नगरसेवकांपैकी ५५ ते ६० नगरसेवक परप्रांतीय? म्हणजे २५% हून जास्त परप्रांतीय नगरसेवक? मनात एकच प्रश्न आला की आम्ही जिंकतोय कि हरतोय?  आजच्या पिढीला कदाचित महाराष्ट्र राज्य निर्मितीची पार्श्वभूमी माहिती नसेल किंवा हुतात्मा स्मारक आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळ हे शब्द कानावर पडले असले तरी त्याविषयीची माहिती आधीच्या पिढीकडून त्यांना कदाचित दिली गेली नसेल. आपल्या प्रांताविषयी भाषिक, सांस्कृतिक अस्मिता नवीन पिढीमधे जागवणे ही खरं तर आधीच्य...

धर्मसत्ता, राजसत्ता आणि संभ्रमित वर्तमान.

धर्मसत्ता, राजसत्ता आणि संभ्रमित वर्तमान. शालेय शिक्षणात आपल्याला ईतिहास या विषया सोबत नागरिक शास्त्र हा एक विषय अभ्यासक्रमात होता. त्यात शिकल्याचे आठवते की लोकशाहीचे तीन प्रमुख आधारस्तंभ असतात आणि त्यातील एक म्हणजे लोकसभा किंवा विधीमंडळ ज्याला हिंदीत संसद असं म्हणतात आणि ज्या ठिकाणी लोकहिताचे कायदे बनवले अथवा पारीत केले जातात, न्यायपालिका हा दुसरा स्तंभ ज्या द्वारे विधी मंडळाने बनविलेल्या कायद्यांच्या आधारे न्यायदान कले जाते, त्यानंतर तिसरा स्तंभ म्हणजे प्रशासन ज्याद्वारे राज्यात कायदा, सुव्यवस्था आणि प्रशासनाचे काम होते. अभ्यासक्रमात त्यावेळी नसलेला आणि अलिकडे सर्वमान्य असलेला असा एक चौथा स्तंभ यात सामील झाला आहे तो म्हणजे प्रसार माध्यमं. या चारही ठिकाणी “उडदामाजी काळे गोरे” या न्यायाने गांभीर्याने, सत्शील व अभ्यासू वृत्तीने व न्यायाने वागणारी जशी माणसं आहेत तशीच उथळ, भ्रष्ट मनोवृत्ती, गुन्हेगारी प्रवृत्तीची पार्श्वभूमी असलेलीही माणसं आहेत. आताच्या काळात आणखीन एक पाचवा स्तंभ यात जोडला जाऊ लागला आहे, आणि तो म्हणजे धर्मसत्ता. आणि हा पाचवा स्तंभ हाच सध्या चिंतेचा विषय होऊन बसलेला आहे...

आजोळच्या आठवणी

आजोळ च्या आठवणी. आज माझ्या मित्राच्या, नितीन तगारेच्या बंगल्यावर तळेगाव मुक्कामी, सकाळचं ऊन शेकत बंगल्या बाहेर खुर्च्या टाकून बसलो होतो. हवेत गारठा छान होता, आम्ही, म्हणजे मी आणि नितीन गप्पा मारत मारत गरम गरम चहाचा आस्वाद घेत होतो. पायाशी श्वान कुटुंबीयही ऊन्हाची ऊब घेत बसले होते. हवेतल्या त्या गारठ्याने आणि सकाळच्या शांत वातावरणाने मला माझ्या बालपणीच्या, आजोळी सुटीत घालवलेल्या काळात अलगद नेऊन ठेवलं. माझं आजोळ नाशिकचं. आम्ही लहान असताना सुटी पडली कि नाशिकला आजोळी जाण्याची ओढ लागायची. आणि मग प्रवासाला निघायचा दिवस जवळ आला कि आदल्या रात्री झोप म्हणून काही लागत नसे. रात्री कमीत कमी तीन चार वेळा तरी आई वडीलांना सकाळ झाली का म्हणून मी विचारे किंवा माझ्या चुळबुळीची चाहुल लागून आईच झोपेतल्या झोपेत दटावे “झोप रे अजून वेळ आहे सकाळ व्हायला”. आई सकाळी लवकरच ऊठे आणि प्रवासात खायला म्हणून भाजी – पुरी किंवा तिखट -.मीठाच्या पुऱ्या, लोणचं वगैरे बांधून घेत असे. एरवी सुटीच्याच काय पण शाळा असे त्या दिवशी सुद्धा लवकर न ऊठणारा मी थोड्याशा खुडबुडीने लगेच ऊठून बसत असे. स्वत:ची स्वत: तयारी करुन तयार होत अ...

आपला रमाकांत

आपला रमाकांत. शनिवारी १९ तारखेला, मी आणि माझे व्याही पुण्याला काही कामा निमित्ताने गेलो होतो. जाताना एक्सप्रेस वे ने गेलो आणि एक्सप्रेस वे ने प्रवास फारच रुक्ष आणि एकसुरी होतो म्हणून येताना जुन्या मुंबई पुणे हायवे ने येण्याचे ठरवले. आता हा जुना हाय वे सुद्धा छान मेंन्टेन केलाय. बरं, वाटेत सर्व जुनी आठवणीतली ठिकाणं लागल्याने त्या आठवणी मनातल्या मनात आठवत आठवत प्रवास मजेत चालला होता. तेवढ्यात विषय रमाकांतच्या वड्याचा निघाला आणि ठरलं कि रमाकांतचा वडा खाऊन मग पुढे जायचं. आता हा जुना रस्ताही एकमार्गी झालेला असल्या कारणाने घाट उतरुन झाल्यावर रमाकांत कडे जायचं असल्यास अर्धा कि.मी. मागे यावं लागतं तसे मागे येऊन रमाकांतच्या दारात येऊन ठेपलो. एकंदरीत तिथली अवस्था पाहून फार वाईट वाटलं. गतवैभवाच्या खुणा अंगावर वागवत एखादा राजा जसा दिसावा तसा हा रमाकांत दिसत होता. हो, रमाकांत हा त्या हायवे वरचा राजाच होता. त्याला भेटल्या शिवाय आणि त्याचा महसूल दिल्याशिवाय एकही प्रवसी मार्गस्थ होत नसे. पण आज दारात आमची गाडी सोडल्यास एक ही गाडी ऊभी नव्हती. एकही गिर्हाईक आत बसलेले नव्हते. दुपार ऊतरणीला लागली होती,...

रेडिओ

रेडिओ तसा रेडिओ लहरींचा शोध लावणे हे पार १९ व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळा पासून सुरु झालेले होते.उपलब्ध माहीती नुसार जर्मनीच्या हेनरिक रुडॉल्फ हर्ट्झ याने ध्वनी लहरीच्या शिस्तबद्ध आणि सूत्रबद्ध पणे प्रसारणाचा पहीला प्रयोग यशस्वी केला व आपला शोध निबंध १८८७ व १८९० साली प्रसिद्ध केला. पुढे २३ डिसेंबर १९०० साली इटलीचा शास्त्रज्ञ गुलेल्मो मार्कोनीने पहीलं उपकरण तयार करुन रेडिओ लहरींद्वारा संदेश वहनाचा पहीला प्रयोग यशस्वी करुन दाखवला आणि रेडिओचा जन्म झाला, साहजिकच रेडिओचे जनकत्व मार्कोनी कडे गेलं. पुढे १९२३ साली या रेडिओला ब्रिटीशांनी भारतात आणलं आणि १९२७ साली मुंबई केंद्र सुरु झालं. भारतीयांच्या जीवनात जरी हा रेडिओ १९२३ साली आला असला तरी तो ब्रिटिश आणि उच्चभ्रूंच्या पर्यंत मर्यादित होता. खऱ्या अर्थाने तो सामान्यांपर्यंत पोहोचण्या करीता स्वातंत्र्योत्तर काळ उजाडावा लागला. तरीही १९५६ पर्यंत जवळपास ४ करोड लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात एकूण २,७५,००० रेडिओ सेट्सची नोंद झालेली होती. पुढे पुढे त्याने आपले हात पाय पसरायला सुरुवात केली आणि सर्व सामांन्यांच्या घरात आणि हृदयात अढळ स्थान पटकावल...

नंदू

नंदू आज सकाळी पावणे पाचालाच जाग आली. हवेत दमटपणा जास्त असल्याने गरम होत होतं म्हणून एसी चालू करुन पुन्हा झोपण्याचा प्रयत्न केला पण पुन्हा काही झोप येईना मग म्हंटलं चला सगळ्यांना गुड मॉर्निंग मेसेज पाठवुया म्हणून फोन ऑन केला. फोन सुरु केला आणि नंदूची तीव्र आठवण आली. ही गुड मॉर्निंग मेसेज पाठवायची सवय मला खरं तर नंदूमुळेच लागली. आधी रोज त्याचे नियमितपणे मेसेजेस येत असत , मग मी त्याला आणि ईतरांना गुड मॉर्निंग मेसेज करायला लागलो आणि आता ती सवय पडून गेली. पण ही सवय लावणारा आमचा नंदू. हेमंत (नंदू) रामकृष्ण जोशी. जन्म ७ जून १९६२. न्यूमरॉलॉजी प्रमाणे ७ हा अंक ज्याचा असतो तो सर्वांशी जुळवून घेणारा आणि जगन्मित्र असा असतो. जर हे खरं असेल तर नंदू अगदी तसाच होता. नंदू माझ्या आयुष्यात आला तो साधारणपणे १९८०-८१ साली. आमची पहिली भेट झाली ती रुपारेल कॉलेजच्या कँटीनच्या कट्टयावर. बरेच दिवस मी त्याचं नाव नंदू हेच समजत होतो नंतर समजलं या ईसमाचं नाव हेमंत रामकृष्ण जोशी आहे. घरातलं नाव नंदू म्हणून आम्ही सारे त्याला नंदूच म्हणायचो. साधारणपणे नीटनेटके पणाने रहाण्याची आवड असलेल्या नंदूची अंगकाठी म्हणजे पाच...

बाबु सायकलवाला

बाबु सायकलवाला काही व्यक्तींचे तुमच्या आयुष्यात येण्याचे योग असतात आणि अशी माणसं तुमच्या आठवणीत कायमची रहातात. त्यापैकीच एक आमचा बाबू सायकल वाला. बाबु ही एक व्यक्ती नव्हे तर एक वृत्ती होती. “बाबु सायकलवाला” हे नांव माहीत नाही अशी व्यक्ती दादर – शिवाजीपार्क भागात शोधून सापडणार नाही असा एक काळ होता. हे नांव ईतकं लोकप्रिय होतं कि नंतर गुगलवर सुद्धा ते पोहोचलं आणि फेसबुकवर सुद्धा या नावाने कम्युनिटी सुरु झाली. लहानमुलांच्या गळ्यातला ताईत असलेला हा ईसम मोठ्यांमधेही तितकाच लोकप्रिय होता. श्यामलवर्णीय, मितभाषी, लाजाळू, भिडस्त ही आणि अशी अनेक विशेषणं अंगी असलेला बाबू सावळा असला तरी देखणा होता. लोकांना आपलंसं करणं त्याच्या स्वभावात होतं. दिलदार, मनमिळाऊ स्वभावाचा हा सद्गृहस्थ आपल्या लाजाळू आणि भिडस्त स्वभावामुळे हल्लीच्या काळात अपेक्षित अशी लौकिकार्थाने “प्रगती” करु शकला नाही. कारण, बाबुची धंदेवाईक नसण्याची वृत्ती. आमच्या गल्लीच्या कोपऱ्यावर मेहेर प्रिमायसेस नांवाच्या बिल्डिंग मधे असलेलं “ बाबुसायकल मार्ट “ नांवाने ओळखलं जाणारं हे दुकान पूर्वी माधवराव भिसे नांवाच्या मालकाचं होतं. दुकानाच...

शाळा

शाळा. आजीच्या जवळी घड्याळ कसले आहे चमत्कारीक. ही कविता ऐकली, आणि बालमोहन शाळेतला वर्ग डोळ्यासमोर ऊभा राहीला. साधारणपणे जूनच्या पहिल्या पंधरवड्याच्या अखेरीस शाळा सुरु होत असे. चांगली दीड दोन महीने कंटाळा येईस्तोवर हुंदडून उन्हाळ्याची सुट्टी जशी जशी संपायला येते तसतशी मुलांना शाळा कधी एकदा सुरु होईल याची ओढ लागलेली असते. आमच्या सारख्या काही जणांना भले शाळेत जाऊन काही नोंद घेण्या ईतपत कामगीरी  येत नसली तरी शाळा सुरु होण्याची मात्र एक सुखद हुरहुर मनाला लागत असे. सरते शेवटी एकदाचा तो दिवस उजाडतोच. तो दिवस जसा जवळ जवळ येत असतो तस तशी त्याची वर्दी घरात अधून मधून आई, वडील किंवा थोरली भावंडं देत असत. " आठ दिवसांनी शाळा सुरू होणार आहे  सगळं सामान आवरलंय ना?" वह्या पुस्तकांना कव्हर्स घातली आहेत का? ई. ई. (बंदोबस्त चोख आहे ना?) ठराविक सुरातली खातरजमा करणारी प्रश्नांची झड पावसाच्या झडी प्रमाणे मधे मधे अंगावर येतच असते. सुटीच्या शेवटच्या दिवसांमधे सर्व नवीन वस्तुंची खरेदी झालेली असते. त्यात प्रामुख्याने नवीन कंपास बॉक्सची खरेदी ही अनावश्यक बाब असतानाही होतेच. वास्तविक पहाता एखादंच करकट...

माझा शैक्षणिक प्रवास

माझा शैक्षणिक प्रवास. माणसाच्या जीवनावर त्याच्या सभोवतालच्या वातावरणाचा सतत प्रभाव पडत असतो आणि त्यातूनच तो घडत बिघडत असतो या गोष्टीवर माझा विश्वास आहे. प्रत्येक गोष्टीला जसा अपवाद असतो तसा या ही गोष्टीला काही अपवाद असेल नाही असं नाही. परंतु सर्वसाधारण पणे माणसाच्या जडण घडणीत सभोवतालच्या परिस्थिती चा महत्वाचा वाटा असतो हे मात्र खरं. माझा जन्म हा शिवजीपार्क भागातल्या डॉ. ठाकूरांच्या निर्मल नर्सिंग होम मधला. ही बाब ईतरांच्या लेखी जरी नोंद घेण्याइतपत महत्वाची नसली तरी माझ्या बाबती मात्र निश्चितच खास अशी होती.  दादर शिवाजी पार्क मधे जन्माला येणं आणि या परिसरात   जीवन जगणं यासाठी त्या व्यक्तीचा  ललाट लेख हा सटवाईने खास वेळ काढून स्वतःने लिहीलेला असावा लागतो असा माझा आपला एक समज आहे. त्याच प्रमाणे दादा रेग्यांच्या बालमोहन या विद्या मंदिरात शिक्षण घेण्याचे भाग्यही सर्वांच्याच वाट्याला येतं असं नाही. त्यसाठी सुद्धा पुर्वजनमीची पुण्याई गाठीशी असावी लागते. अशी पुण्याई माझ्या गाठीशी असावी कारण अशा या सरस्वतीच्या मंदिराच्या शिशुवर्गात १९६४ – ६५ साली मला प्रवेश मिळाला आणि माझा...

तिचं आठवणीत रहाणं

तिचं आठवणीत रहाणं............. कशी कुणास ठाऊक पण आज पहाटे जरा लवकरच जाग आली. घड्याळात पाहीलं तर पहाटेचे पावणे सहा वाजले होते. बाहेर पहाटेची शांतता होती. हिवाळा असल्याने हवेत सुखद गारवा होता. मी फ्रेश होऊन गॅसवर चहाचं आधण चढवून बाल्कनीच्या स्लायडिंग विंडोज ऊघडल्या, पहाटवारा अलगद हळुवार पणे सोबत गारवा घेऊन मला बिलगत घरात शिरला. त्या स्पर्शाने एकदम ताजं तवानं वाटलं. वाफाळत्या चहाने भरलेली कपबशी घेतली आणि रेडीओ ऑन करुन बैठकीच्या खोलीत कंप्युटर चेअर वर येऊन बसलो. एफ् एम् रेन्बो वाहीनी वर पहाटेची सुश्राव्य गाणी लागली होती. अगदी उजाडण्यापुर्वीची वेळ होती, आणि अचानक ती गवळण लागली, रात्र काळी, घागर काळी.......... सुरेल शब्द कानावर पडत होते, आणि त्याच बरोबर तीची आठवण आली. तीची आठवण आली कि मन काहीस अस्वस्थ होतं, तसं तीचं वय हे जाण्याचं नव्हतं. काळाने अगदी अकाली तिला या जगातनं अलगद ओढून नेलं, पाठीमागे तिच्या दोन गोंडस मुली आणि यशस्वी उद्योजक पति यांचे पाश तोडून तिला नेलं. तिची माझी पहीली ओळख १९७४-७५ साली मी रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतन या तळेगावच्या शाळेतून पुन्हा बालमोहन मधे आलो आणि ईयत्ता आठव...

रिगलच्या निमित्ताने......

रिगलच्या निमित्ताने......                हल्ली व्हॉट्स अप् म्हणा फेसबुक म्हणा किंवा ईतर काही म्हणा पण सोशल मिडिया मुळे आपल्या माहितीत चांगल्या-वाईट माहिती, बातम्या, अफवा या साऱ्यांची भर पडत असते. काही खऱ्या काही खोट्या असतात. पण त्या आपल्यापर्यंत पोहोचतात हे मात्र खरं. आपणही त्या गोष्टी पुढे पाठवत असतो. कधी तशाच्या तशा किंवा कधी कधी खरं खोटं तपासून मग. पण प्रसारण हे सुरुच असतं.              तशीच आज एक बातमी आली (खरी की खोटी रिगल वालेच जाणोत.) की दक्षिण मुंबईत असेलेलं रिगल सिनेमागृह लवकरच काळाच्या पडद्याआड जाणार आहे. हे वाचलं मात्र, स्मृती पटलावरची जमा झालेली धूळ वाऱ्याच्या झोताने उडावी तशी उडू लागली, स्मृती पर्णे झर झर उलटू लागली.                 अगदी फार पूर्वी नाही पण अगदी अलीकडे म्हणजे साधारणपणे ८० च्या दशकाच्या काळात आमच्या युवावस्थेत असताना आम्ही मित्रद्वयींनी म्हणजे मी आणि माझा मित्र हिमांशु पंडित ने तिथे त्या परिसरात घालवलेला काळ डोळ्यासमोर आला. त्यासुमारास आम्ही...