Posts

युरोप डायरी

 युरोप डायरी. केल्याने देशाटन या लोकोक्ती नुसार माणसाचं जीवन प्रवाही आणि विकसित बनवायचं असेल तर त्याने प्रवास करत रहायला हवं. आता प्रवास म्हणजे पर्यटन आणि ते ही देशाबाहेर म्हणजे देशाटन ही आले असा अर्थ काढून आम्ही उभयतांनी युरोपमधील काही देशांत जाऊन यायचं ठरवलं आणि चाचपणी सुरु केली. युरोपात जाण्या मागचं कारण म्हणजे ईथली निसर्गसृष्टी सुंदर आहे. अमेरिकेत बहुतांश शहरी जीवन पहायला मिळतं जे आपण रोजच जगतो. शिवायक्षतिथला व्हिसा घ्यायला जानेवारी २०२५ ची तारीख मिळत होती म्हणून म्हंटलं युरोपात जाऊ. सर्व प्रथम मी एका मराठी समाजात लोकप्रिय असलेल्या यात्रा कंपनीत गेलो आणि तिथून खर्चाची माहिती करुन घेतली आणि म्हंटलं एक दोन दिवसांत सांगतो. हो, कारण घरी येऊन सौभाग्यवतींची संमती घेणं अनिवार्य होतं. गेली ३३ वर्ष मला वेव्हार ज्ञान म्हणून नाही हे ऐकत आलो असल्याने माझ्या संस्कारक्षम मनावर बायकोची मंजूरी ही प्रत्येक कामात आवश्यक असते असे संस्कार झालेले असल्याने मी तिला विचारल्याशिवाय कोणताही निर्णय घेत नाही.परंतु आंतरराष्ट्रीय स्तरावर याची कल्पना नसल्याने त्यांनी दरम्यानच्या काळात चलनाचा दर वाढवल्याने पर...

हार

 हार चेहरा तो मिल जाएगा हमसे भी खुबसूरत ऐ दोस्त, पर बात जब दिल की आएगी तब हार जाओगे. और भी मिलेंगे हमसे भी अमीर ऐ दोस्त, पर बात जब दिल की आएगी तब हार जाओगे. और भी मिलेंगे दिल्लगी करनेवाले ऐ दोस्त, पर बात जब दिल देने की आएगी तब हार जाओगे. मिलनेको तो कई दोस्त मिल जायेंगे ऐ दोस्त, पर जब दोस्ती निभाने की बात आएगी तब हार जाओगे. जिंदगी मे जिगरबाज तो कई मिले हमे भी, पर दिल बेरहमीसे तोडने वाला जिगरी दोस्त मिला तब हम हार गए. पुष्कराज १६-०१-२०२३

भक्ती

 भक्ती झालो मी भिकारी तरी पंढरीचा मागेन भिक्षा मी तुझ्या दर्शनाची आस मला एक तुझ्या दर्शनाची  स्पर्शे ना भावना आसक्तीची झालो मी रंगारी तरी पंढरीचा न्हाऊन निघेन भक्ती रंगी झालो मी व्यापारी तरी तुझ्या भक्तीचा, नफा होई त्यात मज दुप्पटीचा. भक्ती चा व्यापार भक्तीचा व्यवहार चलन  भक्तीचे भक्तीच उदंड. आवर पामरा मोह भौतिकाचा भक्तीवीण नाही सुख या जगी. पांडुरंग रखुमाई विश्वाचे माऊली प्रेमाची साऊली विश्वावरी. देव एकमेव ऊभा वीटेवरी भक्ताचिये द्वारी सवे सहचरी तूच माझा सखा तूच जीवलग नाव घ्यावे मुखी तुझे पांडुरंग. - पुष्कराज चव्हाण   ०१ - ०१ - २०२३.
 सोबत एकांतात राहून पहावं अन् म्हंटलं  स्वतःला एक विचारावं की कुणाच्या सोबतीने रहावं हे बरं की स्वतःच्या सोबतीने रहावं हे खरं? चौऱ्याऐंशी योनींच्या फेऱ्यां नंतर मनुष्य जन्म घेतला खरा.पण माणसाचं माणसाशी वागणं पाहून वाटतं मागचा जन्म जो होता तोच होता बरा. टू बी ऑर नॉट टू बी च्या गोंधळात वर्तमानाला हरवून बसलो. माणसा सारखं तर नाहीच नाही पण प्राण्यां सारखं ही नाही जगलो.  कुणावर रुसावं प्रश्न पडला म्हणून मग मी देवावरच रुसून बसलो. दोष त्याला देऊन मग  एकटाच रडत बसलो. शेवटी स्वतःच्याच सोबतीने मी जगत आलो अन् मग स्वतःच स्वतःला म्हणालो अरे, भूतकाळात डोकाव आणि बघ ईथवर कसे आलो. भूतकाळात डोकावलो पण थांग नाही लागला, स्वतःला नाही ओळखू शकलो आणि सोबतीला हवी म्हणून, निघालो माणसं ओळखायला.  फिर फिर फिरलो आणि माणसं ओळखायला चुकलो बराच विचार केला अन् स्वतःला स्वतःचीच सोबत बरी या निर्णयाप्रत आलो.  ईतक्यात एक हाक आली सोबतीला प्रश्न घेऊन काय करतोयस म्हणाला एकांतात बसून?  वळून पहातो मागे तर मैत्र पहातंय हसून. मान ज्याच्या खांद्यावर विश्वासाने द्यावी टाकून. *©* पुष्कराज चव्हाण

तुज जमेल का हे सखये

 प्रीत जडला छंद जिवाला, झाले स्वप्नवत जगणे. डोळे भरुन आता प्रतिमा तुझी पहाणे. हलकेच तुझे पहाणे अन ओळखीने हसणे. भासे जणू अवतरले भू वरी नभीचे चांदणे. स्वप्नी  तुझे ते  येणे अन् मोहवून जाणे लावी जीवास हुरहूर होई कठीण जीणे तो मंद तुझा सुगंध  करीतसे मज बेधुंद घेऊन कवेत तुजला अर्पावी प्रित स्वच्छंद हे गूज माझ्या मनीचे तव मनी उतरवावे परी सांग मला कसे गं या भावनेस शमवावे? तुज जमेल का हे सखये या जन्मी अन या लोकी? भेटुया या जन्मी की भेटुया स्वर्ग लोकी? © पुष्कराज चव्हाण १२-१०-२०२२

देव आनंद

 देव आनंद ;  काल देव आनंदचा वाढदिवस होता. खरं तर आज जर तो जिवंत असता तर ९९ वर्षांचा असता. आणि अजूनही काही तरुणी त्याच्या प्रेमात पडल्या असत्या याची खात्री आहे. अजूनही तो एखाद्या तरुणालाही लाजवेल अश्या उत्साहाने काम करत राहिला असता. देव आनंद म्हणजे एक अजब रसायन होतं. धरमदेव पिशोरीमल आनंद उर्फ देव आनंद याचा जन्म २६ सप्टेंबर १९२३ साली सध्याच्या पाकिस्तानातील पंजाबातल्या गुरुदासपूर येथील शकरगढ गावात झाला. वडील पेशाने वकील असल्याने घरात शिक्षणाचं वातावरण होतंच त्यामुळे देव ने गव्हर्नमेंट कॉलेज, लाहोर मधून इंग्रजी साहित्य ( English literature ) मधे पदवी सपादन केली. पुढे देव आनंद नोकरीच्या  बाहेर पडला आणि त्याला भारतीय सैन्याच्या टपाल खात्यात सेन्सॉर खात्यात नोकरी मिळाली. पगार होता रुपये एकशे साठ प्रति माह. पण एवढ्यावरच थांबला तर तो देव आनंद कसला? पृथ्वीवर पाठवताना देवाने त्याला एक विलक्षण सुंदर चेहरा आणि एक खास मधुर स्मित दिलं आणि  म्हणाला की जा आणि तुझं नशीब आजमावून बघ. पठ्ठ्या हिरो बनण्यासाठी मुंबईत आला. पण त्याला संधी मिळाली ती पुण्यातल्या प्रभात फिल्म कंपनी मधे. तिथे त...

श्रावण

 अलिकडे या आधुनिक जीवन शैली स्वीकारल्याने किंवा कशामुळे म्हणा पण सणवार काही समजतच नाहीत.  आता बघा श्रावण सुरु झालाय पण मनात अजून तो सण काही उतरला नाही. आज तो शेखर प्रभावळकर च्या लेखामुळे मनात जागा झाला. खरं तर हे सगळे सण वगैरे सर्व मनाच्या स्थिती चे आविष्कार असतात. मानली तर दिवळी, नाहीतर जगणं हे रोजचंच. पण हा श्रावण आला की सारं कसं एकदम पवित्र, शूचिर्भूत होऊन जातं. एकदा का दीप अमावस्या झाली की श्रावण महिन्याची सुरुवात होते. अंघोळ होऊन ओल्या केसांना पंचा गुंडाळलेल्या लोभस रुपात घरातली स्त्री देव्हारा स्वच्छ करुन देव घासून पुसून लख्ख करते, भिंतीवर जिवतीचं चित्र लावते आणि पूजेस प्रारंभ होतो आणि ईथूनच श्रावण खरंतर मनात आणि  वास्तवात, प्रत्यक्षात सुरु होतो. या महिन्यात सणांची आणि पक्वान्नांची रेलचेल असते. या महिन्यात पथ्य-पाणी बाजूला सारुन समोर आलेल्या पकवन्नांवर हात सैल सोडावा आणि यथेच्छ खाऊन घ्यावे व्याधींचे नंतर काय ते पहाता येईल. या दिवसांत दवाखान्यात सुद्धा गर्दी कमी दिसते असं माझं मत आहे. आता घरात खऱ्या अर्थाने मातृसत्ताक पद्धती सुरु होते. सोवळं ओवळं कसोशीने पाळलं जातं. ...