तुज जमेल का हे सखये

 प्रीत


जडला छंद जिवाला, झाले स्वप्नवत जगणे.

डोळे भरुन आता प्रतिमा तुझी पहाणे.

हलकेच तुझे पहाणे अन ओळखीने हसणे.

भासे जणू अवतरले भू वरी नभीचे चांदणे.


स्वप्नी  तुझे ते  येणे अन् मोहवून जाणे

लावी जीवास हुरहूर होई कठीण जीणे

तो मंद तुझा सुगंध  करीतसे मज बेधुंद

घेऊन कवेत तुजला अर्पावी प्रित स्वच्छंद


हे गूज माझ्या मनीचे तव मनी उतरवावे

परी सांग मला कसे गं या भावनेस शमवावे?

तुज जमेल का हे सखये या जन्मी अन या लोकी?

भेटुया या जन्मी की भेटुया स्वर्ग लोकी?


© पुष्कराज चव्हाण

१२-१०-२०२२

Comments

Popular posts from this blog

देव आनंद

भक्ती