शहरा मधले घर कौलारु
शहरा मधले घरं कौलारु. दादर पश्चिम आणि ते ही शिवाजीपार्क सारख्या मुंबई आणि दादर च्या मध्यवर्ती भागात, पांढरपेशा बुद्धीजीवी लोकवस्तीत रहाण्यासाठी मनाजोगतं घर मिळणं यासाठी कर्माचा भाग जितका महत्वाचा आहे तितकाच महत्वाचा गतजन्मीच्या संचिताचा आणि नशीबाचा भाग ही आहे हे नाकारून चालणार नाही. ही जागा अशा मोक्याच्या ठिकाणी आहे कि ईथुन सर्व महत्वाच्या अत्यावश्यक सोयी अगदी सहज चालत जाण्याच्या अंतरावर आहेत. उदाहरणार्थ दोन्ही, मध्य आणि पश्चिम रेल्वेची स्थानके, मुंबईत सर्व ठिकाणी जाता येतील असे बस स्टॉप, चौपाटी, आणि ऊद्याने, सिनेमाघरं, नाट्यग्रुह, भाजीबाजार, नामांकित शाळा, महाविद्यालयं, ईस्पितळं, काय नाही असं नाही. तुम्ही म्हणाल ते ईथे अगदी अवघ्या १० ते १५ मिनिटांच्या अंतरावर हजर आहे. अशा या सर्व सोयींनी युक्त दादरच्या शिवाजीपार्क भागात रहाण्याचे भाग्य आम्हाला लाभले. आम्ही, मूळचे कोल्हापूरचे. वडील कोल्हापूर हून सरकारी नोकरी करण्या साठी मुंबई ला आले आणि गिरगावात माधवाश्रमात रहायला लागले. त्यानंतर वडीलांचे लग्न झाल्यावर वडील आणि आई डोंबिवलीत रहायला गेले. सरकारी नोकरी, ती ही मंत्र्यांकडे खाजगी सचिव, अ...