माधुमालती

 


मधुमालती

गोड गोजिरी अन् नाजुकशी

रंग गुलाबी अन् धवल की

लज्जित होऊनी उभी अवगुंठीत

डोलत होती वाऱ्या संगे 

अवचित आला पाऊस अवखळ

 नहाता नहाता होती मोहरत

समीर बिलगला लाडे लाडे

गाली तिच्या हो लज्जा वाढे

अशी सामोरी येते माझ्या ती

नांव तिचे हो मधुमालती.

- पुष्कराज चव्हाण

१५-०४-२०२२

सकाळी ९-१५


Comments

Popular posts from this blog

देव आनंद

भक्ती