जातं

 जातं

पाळू दुःखाचं सुखाचं त्याला खुंटा बळकट

त्याले जातं म्हणतात करी प्रपंचा तो नीट

एक पाळू घर धनी गरा गरा फिरतो तो

दुजा पाळू माघारीण सांभाळते घरं दारं

जैसे माऊली प्रपंची करी कष्ट रात्रं दिन

चूल मूल सांभाळून लावी लेकरां वळण

दोन पाळूंचे हे जाते धान्य – पीठात नहाते

तैसे कामसू जोडपे समाधानात नहाते.

माझ्या लेकरा बाळांनो कष्टेविण फळं नाही

कष्ट करा प्रामाणिक देव देतो रे आणिक

थकले रे दोन्ही पाळू सैल झाला खुंटा ही तो

संस्कारांचे गंध की हो लावा त्यांच्या कपाळी हो.

टाकीच्या घावाने की हो अंगावर आले वण

सोसलं जीवनी हालं  तेव्हा आलं  देवपण

 आणलेस ईथवर धरुन अन् सांभाळून

ऐशी किरपा राहूदे रे सदा तुझीच वरुन.


© पुष्कराज चव्हाण




Comments

Popular posts from this blog

देव आनंद

भक्ती