मिरजेचे गेस्ट हाऊस.
मिरजेचे गेस्टहाऊस
कॉलेज मधे असताना पासूनच मी काही ना काही ऊद्योग केले आणि सोडून ही दिले. त्यापैकी एक सरकार मान्य देशी दारुच्या डिस्ट्रिब्युटरचा आणि दुसरा टुरिस्ट टॉक्सिचा धंदा होता. या दोन्ही धंद्याच्या कामांच्या निमित्ताने सतत परगावी प्रवास करावा लागत असे. त्याचे कारण असे, की दारुची एजन्सी ही नाशिक जिल्ह्यासाठी होती आणि ती सांगलीच्या शेतकरी सहकारी साखर कारखान्याची होती आणि टुरिस्ट टॅक्सिज या ठाणे बेलापूर रोड येथे नोसिल या कंपनीला आणि राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझर्स या थळ-वायशेत येथे वर्षाच्या करारावर दिलेल्या होत्या. त्यामुळे कॉलेज, सांगली, मुंबई, अलिबाग (थळ-वायशेत),मुंबई, नाशिक, आणि परत मुंबईत कॉलेज साठी असं फिरणं होत असे. त्यात सांगली आणि नाशिकला सरकारी विश्रामगृहात रहाण्याची सोय होत असे. या दोहोंपैकी मला सर्वात जास्त सांगलीतल्या मिरज पंढरपूर रस्त्यावरचं मिरज येथील गेस्ट हाऊस जास्त आवडत असे त्यामुळे मी तिथे जायला नेहमीच ऊत्सुक असे. ब्रिटिश काळात म्हणे गव्हर्नर तिथे येऊन हवापालटा करीता रहात असे.
त्याकाळी म्हणजे ऐंशीच्या दशकात, हिंदुकॉलनीच्या पहिल्या गल्लीत नॅशनल ट्राव्हल्स म्हणून लाटणेकरांची एक प्रवासी कंपनी होती त्यांच्या वातानुकूलित व्हिडीओ असलेल्या बसेस सांगली कोल्हापूरला जाण्यासाठी सुटत असत. तिकिट रुपये ८० फक्त ईतके असे. रात्री नऊ साडेनऊच्या सुमारास बस सुटत असे ती सकाळी सहाच्या सुमारास पोचत असे. सोबत बऱ्या पैकी रोकड असे कारण तेव्हा ऑनची रक्कम रोख भरावी लागत असे आणि बिलाची डिमांड ड्राफ्ट किंवा चेकने भरावी लागे. त्यामुळे लाखभर रुपये सूटकेस मधे घेऊन प्रवास करावा लागे. नेहमीचं जाणं येणं असल्याने सूटकेस सीटवरच्या सामानाच्या जागी ठेवली की मुंबई सोडल्यावर मी झोप येईपर्यंत ड्रायव्हर केबिन मधे बसून प्रवास करीत असे आणि झोप येऊ लागली की मी आपल्या सीटवर येऊन झोपत असे. सकाळी साधारण सहा वाजता किंवा साडेसहा वाजता बस मिरजेत पोहोचत असे. मिरजेला उतरल्यावर टपरीवरचा गुळमट चहा प्यायल्यावर रिक्षा पकडून थेट मिरजेच्या गेस्ट हाऊसवर पोचायचं. प्रसन्न सकाळ, थंडगार वारा सोबत बागेतल्या फुलांचा सुगंध छातीत भरुन घेत असतानाच रिक्षा त्या विश्रामगृहाच्या पोर्च मधे शिरते. पोर्चमधे पांढऱा शुभ्र सदरा आणि लेंगा अशा कपड्यांमधला श्यामलवर्णीय, सात्विक चेहऱ्याचा, कपाळावर चंदन किंवा तत्सम गंधाचा टिळा लावलेला, डोक्यावर गांधी टोपी असलेला, विठोबा नावाचा सेवक स्वागताला ऊभाच असतो. तोंडभर हसून स्वागत झाल्यावर तो तत्परतेने बॅग घेऊन सूट (हो, सूटच. तिथे खोल्या नव्हत्या तेव्हा) मधे नेऊन ठेवे पर्यंत मी रिक्षाचं बिल भरुन सूटमधे येतो. तोपर्यंत विठोबा रजिस्टर मधे एन्ट्री करुन घ्यायला रजिस्टर घेऊन तयारच असतो. रजिस्टर घेऊन तो गेल्यावर जरा पायातले बूट वगैरे काढून हात-पाय तोंड धुऊन बाहेर येऊन बसेपर्यंत विठोबा चहाचा ट्रे घेऊन हजर असे. सूटची अंतर्गत रचना म्हणजे एक भला मोठा दिवाणखाना त्यात एक सोफासेट आणि टी पॉय, अर्ध्या भागात फोल्डिंग पार्टिशनच्या पलिकडे भलं मोठं डायनिंग टेबल आणि खुर्च्या आठ जण बसतील अशी व्यवस्था. दिवाणखान्यात शिरुन डायनिंग टेबलकडे जाताना डाव्या हाताला बेडरुम ती सुद्धा बऱ्यापैकी मोठी त्यात वॉल टू वॉल कार्पेट, भितींना वुडनपॅनेलींग एक ड्रेसिंग टेबल, रायटिंग टेबल, ऐसपैस सागवानी लाकडाचा रोझवुड फिनीशचं पॉलिश असलेला बेड, वर झुंबर आणि बेडरुमच्या पलिकडे बाथरुम त्यात एक बाथ टब, शॉवर विथ हॉट अँड कोल्ड वॉटरच्या मिक्सर सकट, कमोड, भलं मोठं वॉशबेसिन त्यावर मोठा आरसा, त्यावर वेगळे लाईट असा सगळा जामानिमा असे.
विठोबाने आणलेला चहा घेऊन झाला की त्याला सांगायचे मी आता अंघोळ वगैरे करुन फ्रेश होतो मग तू नाश्ता घेऊन ये. आणि हो, मी दुपारी जेवायला नाहीए बरं का? गरम गरम पाण्याने अंघोळ वगैरे करुन तयारी करुन बाहेर येईपर्यंत विठोबाने ब्रेकफास्टचा ट्रे आणलेला असे. त्यात डबल ऑम्लेट, टोस्ट, बटर क्यूब, दोन केळी आणि एखादं फळ आणि कॉफीची किटली, मिल्कपॉट, शुगरपॉट वगैरे असे.
गेस्ट हाऊस मधे एकंदर चार सूट्स होते. तळ मजल्यावर डाव्या बाजूला एक आणि उजव्या बाजूला एक दोन्हीच्या मधे एक भला मोठा डायनिंग हॉल होता. आणि वरच्या मजल्यावर ही तशीच व्यवस्था होती. पोर्चच्यावर पोर्चच्याच आकाराची गच्ची होती तिथे वरच्या मजल्यावरील गेस्ट्स ना मॉर्निंग टी साठी बसता येत असे. गेस्ट हाऊसच्या मागील बाजूस काही अंतरावर किचन होतं आणि तिथे जाण्यासाठी कौलांनी आच्छादित व्हरांडा होता. खानसामा फार उत्तम स्वयंपाक करीत असे. गेस्ट हाऊस खिडक्या दरवाजे ही अगदी प्रशस्त होते त्यामुळे पंख्यांची गरज भासत नसे. वायरिंग, प्लंबिंग सगळं कन्सिल्ड होत. हो, आणि ट्यूबलाईट हा प्रकारच नाही फक्त बल्ब्ज, गेस्ट हाऊसच्या डाव्या उजव्या बाजुला आणि मागील बाजुला भरपूर मोकळी जागा होती. पुढील ऐसपैस पोर्च आणि त्यापुढे आणखीन मोठ्ठी मोकळी जागा होती. त्या पुढे सात आठ पायऱ्या उतरुन गेलं की भली मोठी फुलबाग होती सगळं काही भलं मोठं आणि ऐसपैस या शब्दांतच वर्णन करण्या जोगं होतं. बागेच्या भिंती पलिकडे स्टेट हायवे होता आणि त्यापलिकडे एका कॉलेजचं ग्राऊंड होतं. या सर्व प्रकारा मुळे ते गेस्टहाऊस एखाद्या हवेली सारखंच वाटत असे.
तर अशा प्रकारच्या जागेत रहाताना आपण कोणीतरी राजकुमार असल्या सारखंच वाटत असे आणि गंमत वाटे. बरं दिवस भर काम करुन संध्याकाळी परत आल्यावर चहापाणी झालं की जरा हिशेब ठिशेब लिहून झाल्यावर बागेत फेरफटका मारायला बाहेर पडायचं सोबत विठोबा असायचाच. फिरता फिरता आमच्या गप्पा चालत असत त्यात मिरजेत सतारी कशा चांगल्या बनतात, बाजार कुठे आहे, कोण कोणत्या दुकानाला भेट द्या वगैरे अशाच सटर फटर गप्पा चालत असत. जस जसा काळोख पडायला लागे तसा तो खानसामाला जेवणाचं सांगण्यासाठी निघून जाई. मी सुद्धा मग गेस्ट हाऊस कडे जायला निघे. एव्हाना गेटवरचे पिवळट पांढरट दिवे लागलेले असत पांढऱ्या शुभ्र ईमारतीच्या पोर्च मधले आणि ईतर ठिकाणी दिवेलागणी झालेली असते आणि गेस्ट हाऊस गूढ, रहस्यमय, गंभीर हवेली सारखं दिसू लागे. आता दिवसा होणाऱ्या तुरळक वाहतुकीचा सुद्धा आवाज नसतो. क्वचित एखादा ट्रक रोंरावत जातो आणि तो अगदी दूरवर जाईपर्यंत त्याच्या टायर्सचा आवाज मंद मंद होत जातो. एव्हाना साडे सात आठ वाजलेले असतात आणि भूकही लागलेली असते. हातपाय तोंड धुवून टेबलवर बसेपर्यंत सारं काही टेबलवर लागलेलं असतं. पांढऱ्या शुभ्र टेबल क्लॉथवर पाढऱ्या शुभ्र डिनर प्लेट, क्वार्टर प्लेट, राईस बाऊल, करी बाऊल, पोळ्यांचा कॅसेरॉल, ड्राय चिकनचा बाऊल, स्टेनलेस स्टीलचं सॉल्ट-पेपरच्या सोंगट्या, चकचकीत चमचे ईत्यादी जामा निमा तयार असतो. सामिष भोजनाचा घमघमाट खोलीत येताच जाणवतो आणि होमकुंडात तुपाची धार सोडल्यावर जसा अग्नी भडकतो तशी भूक आणखीनच भडकते. यथेच्छ जेवण झाल्यावर विठोबा सारं काही आवरेपर्यंत मसाला सुपारी तोंडात टाकत शतपावली करायला आमची स्वारी पुन्हा बाहेर पडते. बाहेर नीरव, थकली भागलेली शांतता असते. दूर कुठेतरी कुत्री ओरडत असतात, दुरुन कुठुनतरी मोठ्याने बोलण्याऱ्या माणसांचा अस्पष्ट आवाजही येत असतो. थंडगार वाऱ्याच्या झुळुका अंगावर घेत शतपावली करणं अगदी सुखावह वाटत असतं. एव्हाना साडेनऊ पावणेदहा वाजलेले असतात मी पुन्हा आत जायला निघतो तर पोर्चमधे विठोबा ऊभा. आता त्याच्या बरोबर एक दांडगं काळं कुत्र ही असतं. मग तिथेच पोर्चच्याच पायऱ्यांवर बसून गप्पा मारायला सुरुवात होते. विठोबा अगदी खालच्या पायरीवर आणि मी वरच्या पायरीवर. विठोबाचं कुत्रं त्याच्या पायाशी मुटकुळी करुन बसलेलं. पोर्चमधे दिव्याचा दुधटपिवळा प्रकाश पडलेला असतो. वर दिव्याजवळ पाखरं आणि त्यांना खायला पाल टपलेली असते. खाली मी, विठोबा आणि ते काळं कत्रं गप्पा मारत असतो. आता विठोबाचा नूर काही वेगळाच असतो. आता भूता खेताच्या एकेक गोष्टी तो आपल्या पोतडीतून बाहेर काढत असतो. त्या म्हणे घडलेल्या गोष्टी असतात. गेस्टहाऊस च्या आजूबाजूलाच. मी धीर एकवटून गोष्टी ऐकत असतो. उगाच विठोबाला वाटायला नको की साहेब भित्रा आहे म्हणून. गोष्ट ऐकता ऐकता अर्ध लक्ष वरच्या पालीकडे होतं, अर्ध लक्ष विठोबाच्या पायाशी बसलेल्या कुत्र्याकडे होतं. वर पाल हलली की वाटायचं ही आता आपल्या डोक्यात पडते की काय आणि दचकायला व्हायचं. मधेच काही चाहूल लागली ते कुत्रं भोकांड पसरायचं मग विठोबानं हाड् हाड् केलं की कुत्रं गप बसायचं.कुत्रं शांत झालं की विठोबा सांगतो, साहेब ही जात लय हुशार बरं का भूताखेतांची यांना अदुगरच चाहूल लागती. माझी अजून गाळण उडायची. आयला हा असंच ओरडला की याला कशाची चाहूल लागली? आता एव्हाना अकरा वाजायला आलेले असतात झोपेचं गारुड डोळ्यांवर फिरायला लागलेलं असतं मग उठताना विठोबाला सांगायचं, तू काही आता घरी जाऊ नको मुक्कामाला ईथेच रहा. रात्री विठोबा वळकटी घेऊन येताना होणारा त्याच्या वहाणांचा कर्र कर्र आवाज त्या भयाण शांततेची भयाणता आणखीनच वाढवतो. दारा बाहेर वळकटी सोडल्याची चाहूल लागते, विठोबा दारावर टकटक करतो साहेब मी आलोय बरं का? निवांत झोपा मी हाय दाराशीच. एव्हाना त्याला ही समजलेलं असतं साहेब घाबरलाय. मी ही निवांत झोपतो. दुसरा दिवस उजाडतो आपण व्यवस्थित आहोत याची खात्री होते आणि खूप बरं वाटतं. आता रात्रीच्या बसने निघायचं असतं दिवसभराची काम वेळेत पूर्ण करुन परत येऊन मुंबई ला जायला निघायचं असतं. रात्री बसमधे बसल्या बसल्या विठोबाची आणि गेस्टहाऊसच्या आठवणी चाळवत असतात. काहीही असलं तरी ते गेस्ट हाऊस मनातनं काही जात नसतं ते अधिक आवडायला लागलेलं असतं.
ते मिरजेचं गेस्ट हाऊस असतं.
© पुष्कराज चव्हाण
१०-०४-२०२०

Comments
Post a Comment