Posts

Showing posts from October, 2023

युरोप डायरी

 युरोप डायरी. केल्याने देशाटन या लोकोक्ती नुसार माणसाचं जीवन प्रवाही आणि विकसित बनवायचं असेल तर त्याने प्रवास करत रहायला हवं. आता प्रवास म्हणजे पर्यटन आणि ते ही देशाबाहेर म्हणजे देशाटन ही आले असा अर्थ काढून आम्ही उभयतांनी युरोपमधील काही देशांत जाऊन यायचं ठरवलं आणि चाचपणी सुरु केली. युरोपात जाण्या मागचं कारण म्हणजे ईथली निसर्गसृष्टी सुंदर आहे. अमेरिकेत बहुतांश शहरी जीवन पहायला मिळतं जे आपण रोजच जगतो. शिवायक्षतिथला व्हिसा घ्यायला जानेवारी २०२५ ची तारीख मिळत होती म्हणून म्हंटलं युरोपात जाऊ. सर्व प्रथम मी एका मराठी समाजात लोकप्रिय असलेल्या यात्रा कंपनीत गेलो आणि तिथून खर्चाची माहिती करुन घेतली आणि म्हंटलं एक दोन दिवसांत सांगतो. हो, कारण घरी येऊन सौभाग्यवतींची संमती घेणं अनिवार्य होतं. गेली ३३ वर्ष मला वेव्हार ज्ञान म्हणून नाही हे ऐकत आलो असल्याने माझ्या संस्कारक्षम मनावर बायकोची मंजूरी ही प्रत्येक कामात आवश्यक असते असे संस्कार झालेले असल्याने मी तिला विचारल्याशिवाय कोणताही निर्णय घेत नाही.परंतु आंतरराष्ट्रीय स्तरावर याची कल्पना नसल्याने त्यांनी दरम्यानच्या काळात चलनाचा दर वाढवल्याने पर...