माझ्या आठवणीतला राजकुमार
८ ऑक्टोबर हा हिंदी सिने सृष्टीतल्या राजकुमार या नटाचा जन्मदिवस आणि त्या निमित्ताने सोशल मिडियावर बरंच काही वाचायला मिळालं. अनेक किस्से जे बहुतांशी त्याची विक्षिप्तपणाची प्रतिमा लोकमानसात उभी करणारे होते, माझ्या मनाला ते खटकलं आणि माझं मन भूतकाळात गेलं आणि राजकुमार या हिंदी सिनेनटा बाबतच्या माझ्या मनातल्या आठवणी जाग्या झाल्या. एके काळी आम्ही सर्व कुटुंबिय नेमाने उन्हाळ्याच्या सुट्टीत माथेरानला जात होतो तसेच १९७७ च्या उन्हाळ्यात ही गेलो होतो. माथेरानला पोचल्या बरोबर मी दिवाडकरांकडे जाऊन त्यांची मुलं प्रदीप व संदीप यांना भेटत असे, कारण मी तळेगावला शिकायला असताना ही दोन्ही मुलं माझ्याबरोबर होस्टेलवर आणि शाळेत होती. आणि त्यांच्यामुळे आम्हा मुलांना घोडेस्वारी शिकता आली. त्यांच्या वडिलांनी आपल्या मुलांना घोडेस्वारीची सवय असल्याने आपले दोन घोडे आणि साईस तिथे ठेवले होते आणि त्या निमित्ताने आम्हालाही घोडेस्वारी करायला शिकता आलं. तर झालं असं ७७ च्या त्या उन्हाळ्यात मी नेहमी प्रमाणे दिवाडकरांच्या हॉटेलवर गेलो तर त्या दोन्ही भावंडांतला धाकटा, संदीप मला भेटला आणि त्याने सांगितलं अरे...