Posts

Showing posts from September, 2020

नवनीत

 नवनीत. संध्याकाळचं जेवण आटोपून निवांत बसून हिंदी सिने संगीताच्या मैफलीचा आनंद घेत असतानाच माझी वर्गमैत्रीण अर्चनाचा फोन आला आणि तिच्याकडून तिच्या भावाच्या, जो माझा ईयत्ता पहिली ते चवथी पर्यंतचा वर्गमित्र होता  त्याचे, नवनीत कुलकर्णीचे हृदयविकाराने निधन झाल्याची दुःखद बातमी समजली. बातमी ऐकताच मी अक्षरशः भानावर आलो. अचानक अनपेक्षित अप्रिय घटना घडावी आणि ती आपल्या कानावर आल्यावर जे एखाद्या माणसाचं व्हावं तेच माझं ही झालं. मैफल भंग पावली होती. एक सूर हरपला होता.  अलिकडे जवळचे मित्र जाण्याचे हे असे दुःखद प्रसंग थोड्या थोड्या अवकाशाने लागोपाठ घडले त्यामुळे जीवनाचे हे अंतिम सत्य जवळून पहाण्याचे प्रसंग वरचेवर आले. ज्या मित्राबरोबर त्याच्या सोबतीने अगदीच असमंजस वयातली बालवर्ग, शिशुवर्ग आणि पुढील पहिली ते चवथी पर्यंतची अशी एकूण सहा वर्ष सुखेनैव मजेत घालवली त्याने आयुष्याच्या निवांतपणे जीवन व्यतित करण्याच्या काळात अचानक हात सोडून निघून जाणं हे न पटणारं आणि न रुचणारं असं भासलं. नवनीत हा नावा प्रमाणेच लोण्यासारखा मऊ स्वभावाचा होता. ओळख झाल्यावर पटकन जवळीक निर्माण होणारा दोस्ती करणारा...