जयेश नाडकर
तो पहिल्यांदा भेटला ते रुपारेल कॉलेजच्या कँटीनच्या बाहेर. जवळपास सहाफूट उंचीचा, शिडशीडीत बांध्याचा, जाड काचांचा चष्मा असलेला आणि सतत काही तरी करण्याची सळसळती भरपूर उर्जा अंगात असलेला आमच्यापेक्षा वयाने तीन चार वर्षाने लहान असलेला असा हा जयेश सुरेश नाडकर नावाचा आमचा मित्र वयाच्या ५५ व्या वर्षी अचानक आमच्यातून चटका लावून एग्झीट घैईल असं कधीच वाटलं नव्हतं. सर्व साहसांची आणि खेळ व व्यायामाची आवड असलेला जयेश मजबूत हाडा पेराचा होता. सतत उत्साहाने आणि नवनवीन कल्पनांनी भारलेलं असं हे सळसळतं व्यक्तीमत्व होतं. अत्यंत प्रेमळ स्वभावाने सर्वांना आपलंसं करणारा हा माणूस असंख्य माणसं जोडून होता. कॉलेजात असताना एन् सी सी च्या सर्व परिक्षा देऊन सैन्यात जाण्याची उमेद मनाशी बाळगून होता. मला वाटतं दिल्लीत प्रजासत्ताक दिनाच्या परेडला ही जण्यासाठी त्याची निवड झाली होती आणि तो तिथे गेला होता. धसमुसळेपणा अंगात असल्याने आणि धाडसी स्वभावामुळे कोणताही निर्णय घेण्यासाठी त्याला जास्त वेळ लागत नसे जे काय परिणाम होतील त्याला समर्थपणे तोंड देण्याची त्याची तयारी असे. त्याच्या या स्वभावामुळेच तो वयाने आमच्यापेक्षा लहान ...