भक्ती
भक्ती झालो मी भिकारी तरी पंढरीचा मागेन भिक्षा मी तुझ्या दर्शनाची आस मला एक तुझ्या दर्शनाची स्पर्शे ना भावना आसक्तीची झालो मी रंगारी तरी पंढरीचा न्हाऊन निघेन भक्ती रंगी झालो मी व्यापारी तरी तुझ्या भक्तीचा, नफा होई त्यात मज दुप्पटीचा. भक्ती चा व्यापार भक्तीचा व्यवहार चलन भक्तीचे भक्तीच उदंड. आवर पामरा मोह भौतिकाचा भक्तीवीण नाही सुख या जगी. पांडुरंग रखुमाई विश्वाचे माऊली प्रेमाची साऊली विश्वावरी. देव एकमेव ऊभा वीटेवरी भक्ताचिये द्वारी सवे सहचरी तूच माझा सखा तूच जीवलग नाव घ्यावे मुखी तुझे पांडुरंग. - पुष्कराज चव्हाण ०१ - ०१ - २०२३.