सोबत एकांतात राहून पहावं अन् म्हंटलं स्वतःला एक विचारावं की कुणाच्या सोबतीने रहावं हे बरं की स्वतःच्या सोबतीने रहावं हे खरं? चौऱ्याऐंशी योनींच्या फेऱ्यां नंतर मनुष्य जन्म घेतला खरा.पण माणसाचं माणसाशी वागणं पाहून वाटतं मागचा जन्म जो होता तोच होता बरा. टू बी ऑर नॉट टू बी च्या गोंधळात वर्तमानाला हरवून बसलो. माणसा सारखं तर नाहीच नाही पण प्राण्यां सारखं ही नाही जगलो. कुणावर रुसावं प्रश्न पडला म्हणून मग मी देवावरच रुसून बसलो. दोष त्याला देऊन मग एकटाच रडत बसलो. शेवटी स्वतःच्याच सोबतीने मी जगत आलो अन् मग स्वतःच स्वतःला म्हणालो अरे, भूतकाळात डोकाव आणि बघ ईथवर कसे आलो. भूतकाळात डोकावलो पण थांग नाही लागला, स्वतःला नाही ओळखू शकलो आणि सोबतीला हवी म्हणून, निघालो माणसं ओळखायला. फिर फिर फिरलो आणि माणसं ओळखायला चुकलो बराच विचार केला अन् स्वतःला स्वतःचीच सोबत बरी या निर्णयाप्रत आलो. ईतक्यात एक हाक आली सोबतीला प्रश्न घेऊन काय करतोयस म्हणाला एकांतात बसून? वळून पहातो मागे तर मैत्र पहातंय हसून. मान ज्याच्या खांद्यावर विश्वासाने द्यावी टाकून. *©* पुष्कराज चव्हाण
Posts
Showing posts from November, 2022